BOSS and Marathi Typing (बॉस आणि मराठी टायपिंग)

भारताची बॉस अॉपरेटींग सिस्टीम फेब्रुवारी २०१५ ला उत्साहात वापरावयास सुरवात केली. थोड्या प्रयत्नाने घरचे व महाविदयालयाचे काम पुर्णपणे बॉसवरच करायला लागलो. सुरवातीला काही अडचण जरूर जाणवली पण नंतर चांगला हात बसला.

मराठी टायपिंग साठी गुगल इनपुटचा उत्तम पर्याय आहे पण तो केवळ मायक्रोसॉफ्ट वर आहे हे समजल्यावर खेद वाटला. केवळ बॉस-लिनक्सच नव्हे तर इतर लिनक्सवर सुध्दा गुगल इनपुट नाही हे समजले. मराठी व इतर भाषांमधे टंकलेखन करण्यासाठी बॉसवर Inscript, TypeWriter, Phonetic इत्यादी सोयी होत्या पण त्याचा वापर कसा करायचा ते माहित नव्हते. शिवाय कोणत्याहि प्रशिक्षणा शिवाय त्याचा वापर करता येईल असे वाटले नाही. ते जलद करता येईल का असा प्रश्न होताच. यावर उपाय म्हणुन स्मार्ट फोनवर गुगल इनपुट वापरुन टाइप करायचे व नंतर ते संगणकावर इमेलने पाठवायचे मग लिब्रे अॉफिस मधे घ्यायचे असा मार्ग निवडला. अर्थात तो फारसा समाधानकारक नव्हता.

माझे जेष्ठ स्नेही श्री श्रीकृष्ण जोशी यांनी याबाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले व हा प्रश्न सोडवला. बॉस वापरणाऱ्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल म्हणुन येथे देत आहे.

बॉस मुक्त प्रणालीत अागोदरच अंतर्भुत असलेल्या फोनेटीक किबोर्डचा वापर करून मराठी टंकलेखन कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय गुगल इनपुट इतकेच सहजतेने व जलद गतीने करता येते. खाली दिलेला तक्ता नीट समजुन केवळ दहा ते पंधरा मिनिटात आपण मराठी टंकलेखन वेगाने करु शकाल.

मराठी टायपिंग चार्ट५

भारत अॉपरेटींग सिस्टिम ही मुक्त प्रणाली वापरा. इतरांना ती वापरण्यास उद्युक्त करा. खऱ्या डिजिटल इंडियाचा अनुभव घ्या.

Author’s Email : oak444(at)gmail(dot)com

Leave a comment